EUVIMEDEUVIMED entdecken
Crossref

"आंतरजालावरील मराठी संकेतस्थळाचा उपयोग"

सन्मती गजानन हणशी.

International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 02.07.2026 · 825

DOI: 10.48175/ijarsct-37829 ↗

Kurz gefasst

Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 02.07.2026. Verfasst von सन्मती गजानन हणशी.. Die Arbeit nennt 10 Literaturangaben.

AbstractBibliografische AngabenZitierenVerwandte Studien

Abstract (Originalsprache)

आजचा काळ हा माहिती व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने झपाट्याने प्रगती करणारा काळ आहे. संगणक, मोबाईल आणि इंटरनेट यांच्या साहाय्याने जग अगदी लहान झाले आहे. कोणतीही माहिती काही क्षणांत आपल्या हातात येते. या सर्व प्रक्रियेत आंतरजालाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मराठी भाषा टिकवायची असेल तर तिचा प्रसार करणे व जतन करणे गरजेचे आहे. नव्या तंत्रज्ञानात मराठीला बसवणे व वापरणे महत्त्वाचे आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात संगणकाचा विकास झाला. संगणक मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले. सी-डॅकसारख्या संस्थांनी भारतीय भाषा संगणकाला अनुकूल बनवण्यासाठी कष्ट घेतले. पूर्वी ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तके, वर्तमानपत्रे आणि ग्रंथालये यांच्यावर अवलंबून राहावे लागायचे. मात्र आता आंतरजालामुळे माहिती मिळवण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. विसाव्या शतकाच्या अखेरीस संगणकाचा वापर अपरिहार्य बनला. सर्वांत अगोदर वर्तमानपत्रांनी हे तंत्रज्ञान स्वीकारले आणि १९८०-९० च्या दशकात तालुक्यापर्यंत वापर पोहचला. नंतर आंतरजालाचे तंत्रज्ञान आले. यावर मराठी यायलाच हवी असे वाटले. आज अनेक युनिकोड फाँट उपलब्ध आहेत. मराठी भाषेचा वापर करता आला तर अनेक संधी खुल्या होतील. शिक्षण, व्यवसाय, मनोरंजन, प्रशासन अशा सर्व क्षेत्रांमध्ये इंटरनेटचा वापर वाढला आहे. मराठी भाषा ही समृद्ध परंपरा आणि साहित्य असलेली भाषा आहे. आजच्या डिजिटल युगात मराठी भाषेनेही आंतरजालावर आपले स्थान निर्माण केले आहे. विविध मराठी संकेतस्थळांच्या माध्यमातून माहिती, ज्ञान, साहित्य आणि बातम्या सहज उपलब्ध होत आहेत. आंतरजालाची संकल्पना, विविध प्रकारची संकेतस्थळे आणि विशेषतः मराठी संकेतस्थळांचा उपयोग कसा होतो याचा आढावा घेतला आहे.

Zitieren

APA

हणशी., स. ग. (2026). "आंतरजालावरील मराठी संकेतस्थळाचा उपयोग". International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 825. https://doi.org/10.48175/ijarsct-37829

Vancouver

हणशी. सग. "आंतरजालावरील मराठी संकेतस्थळाचा उपयोग". International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:825. doi:10.48175/ijarsct-37829

BibTeX
@article{2026,
  author = {हणशी., सन्मती गजानन},
  title = {"आंतरजालावरील मराठी संकेतस्थळाचा उपयोग"},
  journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
  year = {2026},
  pages = {825},
  doi = {10.48175/ijarsct-37829}
}
Kostenlos starten →