मराठी बोलीभाषा आणि संशोधन
International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 05.08.2026 · 952
DOI: 10.48175/ijarsct-37534 ↗Kurz gefasst
Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 05.08.2026. Verfasst von डॉ. वैशाली किरण औताडे. Die Arbeit nennt 13 Literaturangaben.
Abstract (Originalsprache)
भाषा हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे. भाषेचा अभ्यास ही प्रत्येक समाजाची शैक्षणिक व सांस्कृतिक गरज असते. आजच्या प्रगत मानवाच्या जीवनाकडे पाहता भाषाहीन समाजाची कल्पनाही करता येत नाही. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भाषा अपरिहार्य आहे. प्रत्येक भाषा ही एक स्वायत्त सामाजिक संस्था असल्यामुळे तिचा इतिहास इतर सामाजिक संस्थांच्या इतिहासाप्रमाणे लिखित साधनांच्या आधारे तयार करता येतो. भाषा सामाजिक स्वरूपाची असल्याने ज्या समाजाकडून ती बोलली जाते त्या समाजाचा इतिहास समाजात घडून आलेली स्थित्यंतरे, सामाजिक प्रवृत्ती समजून घेणे गरजेचे आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत भाषा वैज्ञानिक आणि भाषाशास्त्रीय दृष्टिकोनातून भाषा, बोली आणि समाज यांचे स्वरूप, स्थान, सहसंबंध, भाषा आणि बोलींचे कार्य, बोली आणि समाजाचा सहसंबंध आणि भाषा व बोलींच्या गुणवैशिष्ट्यांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या रेट्यात बोलीभाषांवर इंग्रजी संख्या भाषांचा प्रचंड मारा होऊन बोली समूळ नष्ट पावतात की काय अशी भीती निर्माण झाली आहे. अशावेळी बोलींचे संवर्धन करणे आणि भाषा, बोली व समाज यांचा सहसंबंध अभ्यासणे महत्त्वाचे आहे. आपल्या देशातील संशोधनाचे बरेच श्रेय पाश्चात्य विद्वानांना जाते. पूर्वी भाषेचा अभ्यास म्हणजे साधारण लिखित भाषेचा अभ्यास असे, परंतु आधुनिक भाषा वैज्ञानिकांनी याबाबतीतला दृष्टिकोन बदलला त्यामुळे स्वाभाविकपणे बोलींकडे पाहण्याची वृत्ती बदलली, प्रमाणभाषा ही सुद्धा एक बोलीच असते तिचे जसे व्याकरण किंवा शब्दकोश रचले जातात तसेच स्थानिक बोलींची व्याकरण किंवा शब्दकोश रचने शक्य आहे, हे उघड झाले आहे. बोली भाषेच्या अभ्यासामुळे त्या त्या प्रांतातील संस्कृती, समाजातील चाली - रीती, सण - वार, आचार - विचार, आहार, पोशाख इत्यादी गोष्टी समजून घेता येतात. आधुनिक काळात भाषेच्या अभ्यासाने बोलीकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. पूर्वी बोलीभाषा अशुद्ध, कनिष्ठ मानली जात असे. बोली बोलणाऱ्यास गांवढळ म्हणून हिलनवले जात होते. मात्र आज बोलीभाषा प्रमाणभाषेला समृद्ध करत आहेत. त्यामुळे बोलीभाषेकडे पाहण्याचा संशोधनाचा दृष्टिकोन स्वागतशील आहे.
Zitieren
APA
औताडे, ड. व. क. (2026). मराठी बोलीभाषा आणि संशोधन. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 952. https://doi.org/10.48175/ijarsct-37534
Vancouver
औताडे डवक. मराठी बोलीभाषा आणि संशोधन. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:952. doi:10.48175/ijarsct-37534
BibTeX
@article{2026,
author = {औताडे, डॉ. वैशाली किरण},
title = {मराठी बोलीभाषा आणि संशोधन},
journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
year = {2026},
pages = {952},
doi = {10.48175/ijarsct-37534}
}
EUVIMED