ग्लोबलायझेशन आणि मराठीची सांस्कृतिक ओळख
International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 05.08.2026 · 1016
DOI: 10.48175/ijarsct-37544 ↗Kurz gefasst
Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 05.08.2026. Verfasst von सुचिता यल्लाप्पा कांबळे. Die Arbeit nennt 9 Literaturangaben.
Abstract (Originalsprache)
आजच्या काळात पर्यावरण हा संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि चिंतेचा विषय बनला आहे. औद्योगिकीकरण, शहरीकरण, लोकसंख्येची वाढ आणि नैसर्गिक संसाधनांचा अति- वापर यामुळे पृथ्वीवरील पर्यावरणाचे संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडले आहे. याचा परिणाम म्हणून हवामान बदल, तापमान वाढ, दुष्काळ, पूर, जंगलतोड आणि जैवविविधतेचा ऱ्हास यांसारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मानव आणि निसर्ग यांच्यातील नाते नव्याने समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मानवाच्या जीवनात निसर्गाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. मानवाला जगण्यासाठी लागणाऱ्या अन्न, पाणी, हवा, ऊर्जा आणि निवारा या सर्व गोष्टी निसर्गातूनच मिळतात. त्यामुळे मानव आणि निसर्ग यांच्यातील संबंध अतूट आहेत. प्राचीन काळात मानव निसर्गाशी सुसंवाद साधून जीवन जगत होता. तो निसर्गाला देवतासमान मानत होता. सूर्य, चंद्र, नद्या, पर्वत, झाडे आणि प्राणी यांची पूजा केली जात होती. त्यामुळे निसर्ग आणि मानव यांच्यातील नाते अत्यंत पवित्र आणि जिव्हाळ्याचे होते. परंतु आधुनिक काळात परिस्थिती बदलली आहे. औद्योगिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवाने निसर्गावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. निसर्गाचा समतोल राखण्याऐवजी त्याचे अति शोषण केले गेले. मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करण्यात आली, नद्यांचे प्रदूषण झाले, हवेचे प्रदूषण वाढले आणि नैसर्गिक संसाधनांचा अति वापर करण्यात आला. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आणि हवामान बदलाची समस्या निर्माण झाली. हवामान बदल हा आज जगासमोर उभा असलेला सर्वात मोठा पर्यावरणीय प्रश्न आहे. पृथ्वीचे तापमान हळूहळू वाढत आहे. हिमनद्या वितळत आहेत, समुद्राची पातळी वाढत आहे, पावसाचे प्रमाण अनियमित झाले आहे. काही भागांमध्ये दुष्काळ पडतो तर काही ठिकाणी अतिवृष्टी होते. या सर्व घटनांमुळे मानवाचे जीवन, शेती, प्राणी आणि वनस्पती यांच्यावर गंभीर परिणाम होत आहेत आधुनिक काळात विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग, व्यापार आणि संवाद यासारख्या साधनांच्या प्रगतीमुळे जग खूप जवळ आले असून, या प्रक्रियेला जागतिकीकरण म्हणतात. या प्रक्रियेमुळे विविध देशांतील भाषा, संस्कृती आणि जीवनशैली यांचा परस्पर संपर्क वाढला आहे. याचा परिणाम स्थानिक भाषा आणि संस्कृतीवरही होत असून मराठी भाषा आणि तिची सांस्कृतिक ओळख यावरही झालेला दिसून येत आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाची आधारभूत भाषा आहे. संत साहित्य, लोकसाहित्य, लोककला, सण-उत्सव आणि परंपरांमधून मराठी संस्कृतीची समृद्ध परंपरा व्यक्त होत आली आहे. गणेशोत्सव, गुढीपाडवा, दिवाळी, नवरात्र यांसारखे सण तसेच तमाशा, लावणी, भारूड, कीर्तन आणि लोकनाट्य यांसारख्या लोककलांमधून मराठी संस्कृतीचे वैशिष्ट्यपूर्ण स्वरूप दिसून येते. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. मात्र जागतिकीकरणामुळे शिक्षण, रोजगार आणि तंत्रज्ञान क्षेत्रात इंग्रजीचे महत्त्व वाढल्याने मराठी भाषेचा वापर काही ठिकाणी कमी होताना दिसत आहे. पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढलेला असल्याचे दिसून येत आहे. तरी डिजिटल माध्यमे, इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे मराठी साहित्य, चित्रपट आणि सांस्कृतिक उपक्रमांना जागतिक स्तरावर पोहोचण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे आधुनिकतेचा स्वीकार करताना मराठी भाषा, साहित्य आणि सांस्कृतिक परंपरा जपणे आवश्यक आहे. परदेशात स्थायिक झालेल्या मराठी भाषिकांमुळेही मराठी भाषेचा जागतिक प्रसार होत आहे. त्यामुळे मराठी भाषेला जागतिक स्तरावर एक सांस्कृतिक ओळख प्राप्त होत आहे. अशाप्रकारे समाज, शैक्षणिक संस्था आणि शासन यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे मराठीची सांस्कृतिक ओळख टिकवून ठेवता येईल आणि ती पुढील पिढ्यांपर्यंत समृद्ध स्वरूपात पोहोचवता येईल.
Zitieren
APA
कांबळे, स. य. (2026). ग्लोबलायझेशन आणि मराठीची सांस्कृतिक ओळख. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 1016. https://doi.org/10.48175/ijarsct-37544
Vancouver
कांबळे सय. ग्लोबलायझेशन आणि मराठीची सांस्कृतिक ओळख. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:1016. doi:10.48175/ijarsct-37544
BibTeX
@article{2026,
author = {कांबळे, सुचिता यल्लाप्पा},
title = {ग्लोबलायझेशन आणि मराठीची सांस्कृतिक ओळख},
journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
year = {2026},
pages = {1016},
doi = {10.48175/ijarsct-37544}
}
EUVIMED