EUVIMEDEUVIMED entdecken
Crossref

अभिजात मराठीचा दर्जा आणि संशोधन: भाषेचे प्राचीनत्व आणि भविष्यातील दिशा

प्रा. डॉ. शीला धम्मपाल रत्नाकर

International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 05.08.2026 · 997

DOI: 10.48175/ijarsct-37541 ↗

Kurz gefasst

Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 05.08.2026. Verfasst von प्रा. डॉ. शीला धम्मपाल रत्नाकर. Die Arbeit nennt 8 Literaturangaben.

AbstractBibliografische AngabenZitierenVerwandte Studien

Abstract (Originalsprache)

जननी आणि जन्मभूमीप्रमाणे जन्मभाषेला महत्त्व आहे. कोणत्याही राष्ट्राची आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक इत्यादी सर्वकंष प्रगती ही त्या राष्ट्राच्या भाषिक अविष्कार व आस्मितेवर अवलंबून असते. मराठी भाषेच्या इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकल्यास तिचा प्रवास अनेकदा प्रतिकूल परिस्थितीतून झालेला आहे. संतमहंतांनी, साहित्यीकांनी, विविध राजे, महाराजांनी तिची अभिमानपूर्वक पाठराखण करून तिचा महिमा गायिला आहे. अशा या मराठी भाषेविषयी ‘अमृतातेही पैजा जिंकणारी….. परिमलामाजी कस्तुरी…..’ ही बिरूदावली केवळ स्तवनात्मक वा औपचारिक नाही. “कोणत्याही समाजाची भाषा ही त्या समाजाच्या संस्कृतीची राखण आणि विकास करणारी शक्ती असते. भाषा म्हणजे केवळ तिचा शब्दकोश नव्हे वा तिचे व्याकरण नव्हे किंबहुना तिचे केवळ साहित्यही नव्हे. समाजाची वैचारिक आणि जाणिवात्मक संचित एका युगातून दुसऱ्या युगात नेण्याचे पर्यायाने त्या समाजाच्या जीवनाला आशय आणि आकार देण्याचे कार्यही भाषाच करीत असते. तेव्हा भाषेसंबंधीचे प्रेम म्हणजे शब्दावरील प्रेम नव्हे तर समाजाची जडणघडण करणाऱ्या महाशक्तीवरील प्रेम”.१ दिनांक १२ व १३ ऑगस्ट १९८९ रोजी मुंबईमध्ये भरलेल्या जागतिेक मराठी परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणातून मराठी भाषा व संस्कृती विषयीचा रास्त अभिमान व मराठी भाषेच्या संवर्धनाविषयी तळमळ व्यक्त केलेली दिसून येते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील राहिले म्हणन २७ फेब्रुवारी हा दिवस कवीवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून दरवर्षी साजरा केला जातो.

Zitieren

APA

रत्नाकर, प. ड. श. ध. (2026). अभिजात मराठीचा दर्जा आणि संशोधन: भाषेचे प्राचीनत्व आणि भविष्यातील दिशा. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 997. https://doi.org/10.48175/ijarsct-37541

Vancouver

रत्नाकर पडशध. अभिजात मराठीचा दर्जा आणि संशोधन: भाषेचे प्राचीनत्व आणि भविष्यातील दिशा. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:997. doi:10.48175/ijarsct-37541

BibTeX
@article{2026,
  author = {रत्नाकर, प्रा. डॉ. शीला धम्मपाल},
  title = {अभिजात मराठीचा दर्जा आणि संशोधन: भाषेचे प्राचीनत्व आणि भविष्यातील दिशा},
  journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
  year = {2026},
  pages = {997},
  doi = {10.48175/ijarsct-37541}
}
Kostenlos starten →