ग्लोबलायझेशन आणि मराठीची सांस्कृतिक ओळख
International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 05.08.2026 · 978
DOI: 10.48175/ijarsct-37537 ↗Kurz gefasst
Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 05.08.2026. Verfasst von डॉ. विजया पांडुरंग पाटील. Die Arbeit nennt 8 Literaturangaben.
Abstract (Originalsprache)
प्रस्तुत शोधनिबंधात एकविसाव्या शतकातील जागतिकीकरणाच्या रेट्यात मराठी भाषेची आणि संस्कृतीची बदलती ओळख यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. जागतिकीकरणामुळे जग हे एक 'खेडं' बनले असून, त्याचा परिणाम स्थानिक भाषा आणि संस्कृतीवर होणे अपरिहार्य आहे. या प्रक्रियेमुळे मराठी भाषेसमोर इंग्रजीचे वाढते आक्रमण, 'हिंग्लिश'चा वापर आणि तरुण पिढीचा मातृभाषेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशी गंभीर आव्हाने उभी राहिली आहेत.दुसरीकडे, याच जागतिकीकरणामुळे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मराठी साहित्याला, चित्रपटसृष्टीला आणि खाद्यसंस्कृतीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे जगभरातील मराठी भाषिक एकत्र आले असून, मराठी संस्कृतीचे संवर्धन करण्याच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. जागतिकीकरण आणि स्थानिकीकरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपण जागतिक ज्ञानाची कवाडे उघडी ठेवली पाहिजेत, पण त्याच वेळी आपल्या मराठी संस्कृतीची मुळे घट्ट रोवून ठेवली पाहिजेत. "मराठी पाऊल पडते पुढे" हे केवळ आर्थिक प्रगतीसाठी नसावे, तर ते आपल्या भाषेच्या, कलेच्या आणि मूल्यांच्या जतनासाठीही असावे. आपण जागतिक नागरिक होताना आपले 'मराठीपण' विसरता कामा नये.जागतिकीकरण हे मराठी संस्कृतीसाठी 'संकट' नसून एक 'संधी' आहे. आपल्या संस्कृतीतील चांगल्या गोष्टी जगाला सांगण्याची आणि जगातील चांगले स्वीकारून स्वतःला समृद्ध करण्याची ही वेळ आहे.प्रस्तुत शोधनिबंधात जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर मराठी अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी शिक्षण, साहित्य आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांत कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, याचे विश्लेषण करण्यात आले आहे. निष्कर्षतः जागतिकीकरण नाकारण्यापेक्षा त्यातील संधींचा लाभ घेऊन आपली मुळे घट्ट ठेवणे, हीच काळाची गरज असल्याचे या शोधनिबंधातून स्पष्ट होते.
Zitieren
APA
पाटील, ड. व. प. (2026). ग्लोबलायझेशन आणि मराठीची सांस्कृतिक ओळख. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 978. https://doi.org/10.48175/ijarsct-37537
Vancouver
पाटील डवप. ग्लोबलायझेशन आणि मराठीची सांस्कृतिक ओळख. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:978. doi:10.48175/ijarsct-37537
BibTeX
@article{2026,
author = {पाटील, डॉ. विजया पांडुरंग},
title = {ग्लोबलायझेशन आणि मराठीची सांस्कृतिक ओळख},
journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
year = {2026},
pages = {978},
doi = {10.48175/ijarsct-37537}
}
EUVIMED