EUVIMEDEUVIMED entdecken
Crossref

भारतीय ज्ञान परंपरा आणि लोकसाहित्य

डॉ. व्यंकट बाबूराव सूर्यवंशी

International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 05.08.2026 · 983

DOI: 10.48175/ijarsct-37538 ↗

Kurz gefasst

Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 05.08.2026. Verfasst von डॉ. व्यंकट बाबूराव सूर्यवंशी. Die Arbeit nennt 8 Literaturangaben.

AbstractBibliografische AngabenZitierenVerwandte Studien

Abstract (Originalsprache)

भारतीय संस्कृती एक महान संस्कृती आहे. ‘भारतीय ज्ञान परंपरा’ समृद्ध आहे. भारतीय ज्ञान परंपरेत ज्ञान आणि विज्ञान, लौकिक आणि पारलौकिक, कर्म आणि धर्म आणि त्याग यांचा अद्भुत समन्वय आहे. प्राचीन वेद काळापासूनच भारतीय शिक्षणपद्धतीने जीवनातील नैतिक, भौतिक, आध्यात्मिक आणि बौद्धिक मूल्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. ग्रंथार्जनासोबतच शारीरिक श्रमांचे महत्त्व भारतीय ज्ञानपरंपरेतून अधोरेखित होते. भारतीय ज्ञान परंपरेचा पाया वेद, पुराणे, उपनिषदे, स्मृती, महाकाव्ये आणि धार्मिक तत्त्वज्ञानात्मक ग्रंथांमध्ये आहे. या परंपरेने समाजाला केवळ आध्यात्मिक ज्ञानाबरोबरच जीवन जगण्याचे मार्गदर्शनही केले. ही परंपरा हजारो वर्षांपासून मौखिक आणि लिखित स्वरूपात जतन केली आहे . आजही या परंपरेचा प्रभाव भारतीय संस्कृती आणि जीवनशैलीत स्पष्टपणे दिसतो. लोकसाहित्य हा भारतीय समाजाच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक जाणिवेचा एक भाग असून त्यातून लोकांची भाषा, विचार, भावना आणि अनुभव यांचा समावेश होतो. लोकसाहित्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचे मौखिक स्वरूप, ज्यामुळे ते पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होऊ शकते. यामध्ये लोकगीते, लोककथा, म्हणी, वाक्प्रचार, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होतो. हे केवळ मनोरंजनाचे माध्यम म्हणून काम करत नाही, तर सामाजिक आणि नैतिक मूल्यांचे जतन करते. भारतीय ज्ञान परंपरेत हजारो वर्षांचा सांस्कृतिक, धार्मिक आणि वैज्ञानिक उपलब्धींचा एक विशाल संग्रह आहे. जो पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होत आला आहे. वेद, पुराणे, उपनिषदे, महाकाव्ये आणि इतर ग्रंथांसोबतच, लोकसाहित्यानेही या परंपरेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. भारतीय समाजाची ज्ञान परंपरा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे लोकसाहित्य हे एक प्रमुख माध्यम आहे. मौखिक परंपरा, लोकगीते, कथा, म्हणी आणि लोकनाट्यांच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक, नैतिक, वैज्ञानिक आणि तात्विक ज्ञानाचा प्रसार करते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये भारतीय ज्ञान परंपरेवर भर देण्यात आलेला आहे. सुसंस्कारासोबतच मातृभाषा आणि शारीरिक शिक्षणाचाही सांगोपांग विचार या नव्या शैक्षणिक धोरणात करण्यात आलेला आहे. प्राचीन काळी गुरूंना सर्वश्रेष्ठ समजले जात असे. नव्या धोरणातही सर्वगुणसंपन्न विद्यार्थी घडविताना शिक्षकांकडूनही निस्वार्थी, त्यागी आणि सर्वज्ञानी असण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली आहे. भारतीय शिक्षण व्यवस्थेचे जगभरात जे स्थान प्राचीन काळी होते. तेच परत मिळविण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण प्रयत्नशील आहे.

Zitieren

APA

सूर्यवंशी, ड. व. ब. (2026). भारतीय ज्ञान परंपरा आणि लोकसाहित्य. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 983. https://doi.org/10.48175/ijarsct-37538

Vancouver

सूर्यवंशी डवब. भारतीय ज्ञान परंपरा आणि लोकसाहित्य. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:983. doi:10.48175/ijarsct-37538

BibTeX
@article{2026,
  author = {सूर्यवंशी, डॉ. व्यंकट बाबूराव},
  title = {भारतीय ज्ञान परंपरा आणि लोकसाहित्य},
  journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
  year = {2026},
  pages = {983},
  doi = {10.48175/ijarsct-37538}
}
Kostenlos starten →