EUVIMEDEUVIMED entdecken
Crossref

निवडक प्रार्थनांचा चिकित्सक अभ्यास

श्री. महादेव दादाराव ठोंबरे

International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 01.07.2026 · 760

DOI: 10.48175/ijarsct-36898 ↗

Kurz gefasst

Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 01.07.2026. Verfasst von श्री. महादेव दादाराव ठोंबरे. Die Arbeit nennt 9 Literaturangaben.

AbstractBibliografische AngabenZitierenVerwandte Studien

Abstract (Originalsprache)

‘प्रार्थना’ हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ इच्छा व्यक्त करणे, स्तुती करणे व याचना करणे असा होतो. प्रार्थना ही मानवी जीवनातील एक महत्त्वपूर्ण आध्यात्मिक व मानसिक प्रक्रिया आहे. प्रार्थनेमुळे मन एकाग्र होते, प्रसन्नता निर्माण होते आणि व्यक्तीच्या विचारांमध्ये सकारात्मकता येते. त्यामुळे दिवसाची सुरुवात आणि समारोप प्रार्थनेने होणे आवश्यक मानले जाते. निवडक प्रार्थनांचा चिकित्सक अभ्यास म्हणजे विविध प्रकारच्या आणि विविध भाषांतील प्रार्थनांचा तर्कशुद्ध व सखोल अभ्यास होय. या अभ्यासामध्ये प्रार्थनेचा आशय, अर्थ, तत्त्वज्ञान, नैतिक मूल्ये आणि मानवी मनावर होणारा परिणाम यांचे विश्लेषण केले जाते. तसेच प्रत्येक प्रार्थना व्यक्तीला काही ना काही जीवनमूल्यांची शिकवण देते, हा या अभ्यासाचा गाभा आहे. प्रार्थनेचा संबंध केवळ एखाद्या विशिष्ट धर्माशी किंवा पंथाशी मर्यादित नसून तो सार्वत्रिक मानवी मूल्यांशी निगडित आहे. प्रार्थनेमुळे मन:शांती, आत्मपरीक्षण आणि नैतिक मूल्यांची जपणूक होते. ती व्यक्तीला अंतर्मुख करून जीवनातील योग्य दिशा दर्शवते. उदाहरणार्थ, “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः” या प्रार्थनेत गुरुचे महत्त्व अधोरेखित केले आहे. अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देणारा गुरु हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे स्वरूप मानला आहे. या प्रार्थनेतून गुरुविषयी आदर, प्रेम आणि कृतज्ञता निर्माण होते. निवडक प्रार्थनांचा अभ्यास करताना त्यातील भाषाशैली, आशय, उद्देश आणि मूल्यव्यवस्था यांचे चिकित्सक विश्लेषण करण्यात आले आहे. प्रार्थनेतून सत्य, अहिंसा, करुणा, मानवता, आदर, प्रेम, शांतता आणि सहकार्य यांसारखी मूल्ये व्यक्त होतात. प्रस्तुत शोधनिबंधात अशा काही निवडक प्रार्थनांचा सखोल चिकित्सक अभ्यास करण्यात आलेला आहे.

Zitieren

APA

ठोंबरे, श. म. द. (2026). निवडक प्रार्थनांचा चिकित्सक अभ्यास. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 760. https://doi.org/10.48175/ijarsct-36898

Vancouver

ठोंबरे शमद. निवडक प्रार्थनांचा चिकित्सक अभ्यास. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:760. doi:10.48175/ijarsct-36898

BibTeX
@article{2026,
  author = {ठोंबरे, श्री. महादेव दादाराव},
  title = {निवडक प्रार्थनांचा चिकित्सक अभ्यास},
  journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
  year = {2026},
  pages = {760},
  doi = {10.48175/ijarsct-36898}
}
Kostenlos starten →