पर्यावरणवादी साहित्य आणि मानवी संवेदना: माणूस- निसर्ग नात्याचा अभ्यास
International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 05.08.2026 · 878
DOI: 10.48175/ijarsct-37521 ↗Kurz gefasst
Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 05.08.2026. Verfasst von प्रा. कल्पना दत्तात्रय शिंगाडे. Die Arbeit nennt 4 Literaturangaben.
Abstract (Originalsprache)
पर्यावरण पृथ्वीवरील सर्व सजीवांच्या जीवनाचा आधार आहे. मानव, प्राणी, वनस्पती आणि इतर जीवनसृष्टीवर अवलंबून असते. परंतु आधुनिक काळात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाने निसर्गावर मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केला आहे. औद्योगिकरण शहरीकरण आणि लोकसंख्या वाढीमुळे जंगलतोड वाढली आहे.प्रदूषण वाढले आहे आणि नैसर्गिक संसाधनाचा अतिवापर होऊ लागला आहे.त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे. या परिस्थितीचा परिणाम हवामानावर दिसून येतो.पावसाचे प्रमाण कमी किंवा जास्त होणे दुष्काळ व पूर ,तापमान वाढ आणि हिमनद्यांचे वितळणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत .त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न हा जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाचा बनला आहे. या पार्श्वभूमीवर साहित्यिकांनी आपल्या लेखनातून पर्यावरणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. पर्यावरणवादी साहित्य हा असा साहित्य प्रवाह आहे ज्यामध्ये निसर्गाचे महत्त्व पर्यावरणाचे संरक्षण आणि माणूस निसर्ग -संबंध यांचे चित्रण केले जाते.व साहित्याच्या माध्यमातून पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे कार्य केले जाते. मराठी साहित्यात अनेक कवींनी निसर्गाचे विविध रूप अत्यंत सुंदर आणि संवेदनशील पद्धतीने मांडले आहे. उदा-ना.धो.महानोर,इंदिरा संत यांच्या कवितांमध्ये निसर्गाचे सौंदर्य ,ऋतूचे बदल, पाऊस, दुष्काळ आणि ग्रामीण जीवन यांचे प्रभावी चित्रण आढळते.ना.धो.महानोर यांच्या कवितांमध्ये ग्रामीण जीवन आणि शेतीशी निगडीत निसर्गाचे वास्तववादी चित्रण दिसते आणि इंदिरा संत यांच्या कवितांमध्ये निसर्गाशी जोडलेल्या मानवी भावनांचे सूक्ष्म वर्णन आढळते. अशाप्रकारे ना. धो. महानोर यांच्या कवितेत निसर्ग हा मानवी जीवनाचा आधार आणि ग्रामीण वास्तवाचे प्रतीक आहे तर इंदिरा संत यांच्या कवितेत निसर्ग हा मानवी मनातील भावना आणि संवेदनाचा आरसा आहे. अशाप्रकारे दोन्ही कवींच्या कविता मधून पर्यावरण आणि मानवी जीवनाचे घनिष्ठ परस्परावलंबी नाते स्पष्ट होते.
Zitieren
APA
शिंगाडे, प. क. द. (2026). पर्यावरणवादी साहित्य आणि मानवी संवेदना: माणूस- निसर्ग नात्याचा अभ्यास. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 878. https://doi.org/10.48175/ijarsct-37521
Vancouver
शिंगाडे पकद. पर्यावरणवादी साहित्य आणि मानवी संवेदना: माणूस- निसर्ग नात्याचा अभ्यास. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:878. doi:10.48175/ijarsct-37521
BibTeX
@article{2026,
author = {शिंगाडे, प्रा. कल्पना दत्तात्रय},
title = {पर्यावरणवादी साहित्य आणि मानवी संवेदना: माणूस- निसर्ग नात्याचा अभ्यास},
journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
year = {2026},
pages = {878},
doi = {10.48175/ijarsct-37521}
}
EUVIMED