EUVIMEDEUVIMED entdecken
Crossref

कंटकांजली: एक आधुनिक संस्कृत विडंबन काव्य

श्री. जयंत विनायक अभ्यंकर

International Journal of Advanced Research in Science Communication and Technology · 01.07.2026 · 773

DOI: 10.48175/ijarsct-36900 ↗

Kurz gefasst

Fachartikel in der Zeitschrift International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, online erschienen am 01.07.2026. Verfasst von श्री. जयंत विनायक अभ्यंकर. Die Arbeit nennt 7 Literaturangaben.

AbstractBibliografische AngabenZitierenVerwandte Studien

Abstract (Originalsprache)

प्राचीन संस्कृत साहित्यात विडंबन (satire) ही शैली दुर्मीळ असली तरी, कंटकांजली हे संस्कृत काव्य आधुनिक काळातील सामाजिक-राजकीय वास्तवाचे चित्रण करून संस्कृतला जिवंत ठेवते. १९६५ साली कृष्ण श्री. अर्जुनवाडकर यांनी हे संस्कृत काव्य रचले आहे. या मुक्तक काव्यात स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकीय भ्रष्टाचार, नोकरशाहीचा अपव्यय आणि सामाजिक ढोंगीपणा यांवर सडेतोड व मार्मिक टीका त्यांनी केली आहे. मानव्यविद्येच्या अभ्यासाच्या उभरत्या सीमांत साहित्य संवर्धनामध्ये (Informative Frontiers of Emerging Trends in Humanities) संस्कृत साहित्य हे केवळ ऐतिहासिक वारसा नाही, तर समकालीन सामाजिक-राजकीय टीकेचे शक्तिशाली माध्यम आहे. त्या दृष्टीने कंटकांजली हा संग्रह समकालीन संस्कृत साहित्याचा २० व्या शतकातील उत्कृष्ट नमुना आहे. कंटकांजली हे शीर्षक आणि कंटक अर्जुन (किंवा कंटकार्जुन) हे कवीचे नाव हे संस्कृत साहित्यातील विशेषतः विडंबन काव्याच्या दृष्टीने अत्यंत यथार्थ आहे. यामागे खोल विडंबनात्मक (satirical) अर्थ आहे. जिथे सामान्यतः “पुष्पांजली” (फुलांची श्रद्धांजली) दिली जाते, तिथे कवी “काट्यांची अंजली” देतो. म्हणजे समाजातील, राजकारणातील, साहित्यिक वर्तुळातील, मानवी दोष, ढोंग, भ्रष्टाचार, मूर्खपणा या सर्व “काट्यांना” (दुर्गुणांना) कठोर, तिखट, व्यंगात्मक मुक्तकांनी “अर्पण” करणे. हे पूजा नव्हे, तर व्यंग्य प्रहार आहे. कवी स्वतःला “अर्जुन” म्हणवतो, तेव्हा मी समाजातील काटे (दुर्गुण, ढोंगी, भ्रष्ट) मारण्यासाठी धनुष्य उचललेला अर्जुन आहे असे कवीला म्हणावयाचे आहे. या पेपरमध्ये कंटकांजलीचे आधुनिक संस्कृत विडंबन काव्य म्हणून परीक्षण केले आहे, संस्कृतमधील एक वेगळा निर्मितीप्रकार म्हणून या ग्रंथाचा या शोधनिबंधात अभ्यास करणार आहे. या संशोधन पेपरमधील कीवर्ड्स: कंटकांजली – मूळ शीर्षक (काट्यांची अंजली), विडंबन काव्य – व्यंग्य/विनोदी काव्य शैली मुक्तक – स्वतंत्र छोटे काव्य, व्यंग्य – दुर्बलता मार्मिक – नेमकी,चपखल कंटक – काटा, विघ्न, दुर्गुण, क्षुद्र शत्रू , अंजली – श्रद्धांजली, अर्पण (विरोधाभासात्मक वापर)

Zitieren

APA

अभ्यंकर, श. ज. व. (2026). कंटकांजली: एक आधुनिक संस्कृत विडंबन काव्य. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology, 773. https://doi.org/10.48175/ijarsct-36900

Vancouver

अभ्यंकर शजव. कंटकांजली: एक आधुनिक संस्कृत विडंबन काव्य. International Journal of Advanced Research in Science Communication and Technology. 2026:773. doi:10.48175/ijarsct-36900

BibTeX
@article{2026,
  author = {अभ्यंकर, श्री. जयंत विनायक},
  title = {कंटकांजली: एक आधुनिक संस्कृत विडंबन काव्य},
  journal = {International Journal of Advanced Research in Science Communication and Technology},
  year = {2026},
  pages = {773},
  doi = {10.48175/ijarsct-36900}
}
Kostenlos starten →